Caste and everyday social.
आमच्या तांड्याशेजारील गावात मारवाड्यांची राजकीय आणि व्यापारी मोनोपॉली आहे. किराणा पासून ते भांडी विक्रेते पर्यंत इथून तिथून सगळे तेच. तांड्यातील एक मध्यम शेतकरी माणूस अशाच एका व्यापाऱ्याचा ग्राहक आहे. काही अंशी त्यांच्यात छान असे वैयक्तिक आणि मैत्रीपूर्ण संबंधही आहेत. तांड्यावरच्या त्या शेतकऱ्याची मुलगी आणि जवाईबुवा शहरात राहतात. जवाईबुवा सरकारी खात्यात नोकरीला आहेत. व्यापारी शेठ शहरात कार खरेदी ला गेले असल्याचे शेतकऱ्याला कळविले. शेतकऱ्याने म्हटले की आपले जवाईबुवाही शहरात राहतात त्यांनी नंबर दिला. जावाईबुवा म्हणजे अथक कष्टाने शिक्षण घेतलेला माणूस ज्याला सगळी जाण आहे, त्याने आपुलकीने शेठ ची विचारपूस केली जावईबुवा अर्थात अधिकारी पण तितकाच मातीशी जुडलेला माणूस, त्याने शेट ला घरी येण्याचा आग्रह केला पण वेळेअभावी शेटला जाता आले नाही. बाकी मग शेटजी गावी परतल्यावर त्यांनी तांड्यावरच्या त्या शेतकऱ्याची भेट घेतली आणि म्हटला "क्या आदमी है रे वो । बंजारा है करके लागताइ नई, नई तो साले तुम्हारे बंजाल्डे थोडा पैसा आया की मात जाते" शेतकऱ्याला काय तांड्यावरच्या कोणालाही हे आक्षेपार्ह वाटत नाही. बंजाल्डे, तुम ऐसे तुम वैसे असे सगळे म्हणणे आधीच internalized आहेच. एकदा मी माझ्या मित्रांमध्ये बोलत असतांना म्हटलो की ह्या मारवाडी शेठ पेक्षा माती खणणारे आपले माय बाप कमी श्रम करतात का ? मग त्यांच्या श्रमाचा मोबदला कोणी पळवला? हे मात्र त्यांना आक्षेपार्ह वाटले होते ते म्हटले.
"कई बी किस तू आब" (आता तू काहीही म्हणशील)
"बंजाऱ्याची येडी सकाळी उठून तोंडात घालीन काडी" (काडी म्हणजे दातून. )
"गोर गोल्डी अन हातेम भोल्डी"
"गोर अन ढोर"
अशा प्रचलित म्हणी तर आहेच आहे. श्रमाच्या मोबदल्याच्या चोरीपासून तर या सामाजिक मानखंडने पर्यंत मला सगळे 'आक्षेपार्ह' वाटते. तांड्यावरच्या आताच्या मिल्लेनियल पिढीला तरी हे 'सर्वच' आक्षेपार्ह वाटवं म्हणून लिहावे वाटले.
Mast vichar mandlet dada
ReplyDeleteअतिशय छोट्या प्रसंगातून प्रभावी विचार मांडले आहेत. विचार करायला भाग पाडणारे....
ReplyDelete