Thursday, September 26, 2024

"संस्कृती" मध्यमवर्गीयांची आणि कामगारांची (तांड्यावरच्या नोंदी)

"संस्कृती" मध्यमवर्गीयांची आणि कामगारांची

जातीव्यवस्था किंवा जमातीतील नातीगोती व्यवस्था कुठल्याही समूहाला एक सांस्कृतिक 'एकत्व' बहाल करते. राजकीय अर्थव्यवस्थेतील बदलत्या आयामांमुळे अशा समुहांतील लोकांचे स्थलांतर, विस्थापन, स्थानांतरण किंवा परिघिकरण होण्याची दिर्घ प्रक्रिया अनेक दशकांपासून होत असल्याचं आपण बघत आहोत. पण शहरात जाणारे हे समूह तिथेही आपलं सांस्कृतिक एकत्व अबाधित ठेवतात का? उत्तरादाखल एक नजिकचं निरीक्षण नोंदवावं असं वाटतं. 

महाराष्ट्रातील बंजारा समूह प्रायः बांधकाम मजूर आणि हातमजुरी किंवा अप्रशिक्षित कामगार म्हणून मुंबई सारख्या शहरांमध्ये आढळतो. या शहरांच्या गगनचुंबी इमारती याच विस्थापित, परिघावर राहणाऱ्या कामगारांच्या घामाने सिंचलेल्या असतात. शहरातील outskirts हे एका अर्थाने ग्रामीण भागाचे extention असतात. शहरात असूनही हे समूह आपली नाती-गोती, प्रथा-परंपरा शक्य ते प्रयत्न करून जपण्याचा प्रयत्न करत असतात. 

सहसा चाळीत, किंवा बांधकामाच्या ठिकाणीच तात्पुरती खोली बनवून ही समूह राहत असतात, तिथेच मग ते एकमेकांचा आधार असतात, भाषा, प्रांत आणि जात अशा घटकांनी त्यांची सामाजिकता घडत असते, दैनंदिन व्यवहार होतो इत्यादी. अनेक बंजारा बांधकाम मजुरांशी बोलल्यावर असं कळलं की सण उत्सवाला ते आपल्या मूळ गावी परत जातात, आणि त्याच जातीतील शहरी-मध्यमवर्गीय तिथंच राहून मोठमोठ्या हॉल मध्ये आपले सण साजरे करतात. त्या साजऱ्या करण्यात फक्त भोंगळपणा असतो, डीजे च्या कर्कश आवाजात मूळ संस्कृती आणि गाणी विरून जातात. हे शहरातील जातीव्यवस्थाक घेटोज असतात. हे डिजे वाले समूह त्यांच्या त्यांच्यातच रोटी बेटी व्यवहार करतात. एकच जात आपल्यातील रोटी-बेटी व्यवहाराच्या आधारे (पितृसत्तेच्या) जातीय आणि वर्गीय स्थान अबाधित ठेवते, आहे की नाही कमाल !



सोनाचंद बन गया 'कॉमन मॅन'

तुम्ही राज कपूरचा श्री ४२० पाहिलाय का? नसेल पाहिला तर त्याची पटकथा थोडक्यात देतो, असेल तर हा भाग स्किप करू शकता.  राज (राज कपूर) हा अलाहाबाद...